सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. परंतु आजही अनेक मुली शाळेपासून वंचित राहत असून विविध कारणांमुळे त्यांना आपले शिक्षण सोडावे लागत असल्याचे चित्र विविध सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.
राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थिनींना आजही मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने 2020 मध्ये दहावी बारावी पास झालेल्या मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी जवळपास 11 हजार 121 मुलींचे सर्वेक्षण केले. यामध्ये जवळपास 51 टक्के मुलींनी शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सक्षम नसल्याचे स्पष्ट केले.तरी यंदा देखील जिल्ह्यातील शाळाबाह्य किशोरी मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये 36 मुलींची शाळा सोडल्याची माहिती समोर आली.
राज्य सरकार मुलींसाठी विविध योजना, शिष्यवृत्ती प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवत असते. परंतु मुलींना जास्त शिक्षण देण्याची मानसिकता नसणे आणि कमी वयात मुलींची लग्न करणे या दोन प्रमुख कारणांमुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले