Kersuni

Kersuni : लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा का केली जाते?

5480 6

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरीही परंपरा, संस्कृती आणि काही गोष्टींचे धार्मिक महत्त्व कमी होत नसल्याचे दिवाळीसारख्या सण-उत्सवात दिसून येते. लक्ष्मी पूजनाला आवर्जून स्थान असणाऱ्या केरसुणीची (Kersuni) पूजा का केली जाते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

दिवाळी खरेदीत आकाश कंदील, पणत्या, फटाके आणि कपड्यांसोबत नव्या केरसुणीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला खरेदी करून लक्ष्मी पूजनाला तिची पूजा करण्याची परंपरा आहे. केरसुणीला लक्ष्मी असे म्हणतात. त्यामुळे तिची पूजा केली जाते. ग्रामीण भागात आजही ही प्रथा पाळली जाते.

लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असलेली केरसुणी बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. आधुनिक काळातही नागरिक केरसुणी खरेदीसाठी विशेष पसंती देत आहेत. शिंदीच्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या केरसुणीला दिवाळीत पूजनासाठी महत्त्वाचे स्थान असते. परराज्यातूनही केरसूणी बाजारात विक्रीला येत आहे.मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडांच्या पानापासून केरसुणी तयार केली जाते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide