पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय आले लिंबू पाचक

671 0

छोट्या मोठ्या शारीरिक व्याधींवर उगाचच गोळ्या आणि टॅब्लेट्स घेऊन साइड इफेक्ट करून घेण्यापेक्षा आयुर्वेदाची औषधे घेणे नेहमी फायदेशीर ठरते. विशेषतः पोटाच्या तक्रारींवर एक चांगला उपाय म्हणजे आले लिंबू पाचक. शिवाय हे घरच्या घरी तयार करता येते.

बाजारात आले लिंबू पाचक विकत मिळते. काही ठिकाणी ते दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे त्याचे फायदे होण्याऐवजी तोटे जास्त होतात. अशा वेळी चांगल्या प्रतीचे उत्पादन घ्यावे किंवा घरच्या घरी बनवावे. हे पाचक बनवणे अतिशय सोपे आहे. एकदा करून ठेवले की महिना भर सहज टिकते. हे पाचक अधिक प्रमाणात घेऊन चालत नाही. कारण अतिप्रमाणात घेतल्याने शरीराचा दाह होऊ शकतो. अतिसार होऊ शकते. म्हणून सकाळी चहा घेण्याच्या अर्धा तास अंशपोटी एक चमचा रस पाण्यात टाकून घ्याव. आता हे पाचक कसे बनवायचे त्याची पद्धत जाणून घेऊ!

आले लिंबू पाचक करण्याची पद्धत

आले स्वच्छ धुवून वाळवून घ्या. आल्याच्या चकत्या करून मिक्सरवर पेस्ट करून घ्या. पाणी अजिबात घालू नका. त्या पेस्टचा रस करून गाळून घ्या. त्यानंतर लिंबे धुवून त्याचा रस काढा. आले आणि लिंबाचा रस एकत्र करा. त्यात शेंदेलोण, हिंग आणि चवीपुरते मीठ घाला. फ्रिजमध्ये ठेऊन महिनाभर खाता येऊ शकते.

हे पाचक अधिक प्रमाणात घेऊन चालत नाही. कारण अतिप्रमाणात घेतल्याने शरीराचा दाह होऊ शकतो. अतिसार होऊ शकते. म्हणून सकाळी चहा घेण्याच्या अर्धा तास अंशपोटी एक चमचा रस पाण्यात टाकून घ्यावे.

Share This News
error: Content is protected !!