साखरेऐवजी गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अलीकडे गुळात (Jaggery Benefits) असलेले पौष्टिक तत्वे पाहता. साखरेऐवजी गोड पदार्थांमध्ये गुळ वापरला जातो. हिवाळ्यातील दिवसांत गुळ खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले घटक हे गुळामध्ये आढळले जातात. यात व्हिटॅमिन- ए आणि बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि मॅग्नेशियमसारखे घटक गुळामध्ये असतात. चला तर मग जाणून घेऊया गुळापासून होणारे फायदे…
रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखते
गुळात असलेले अँटीकोगुलेंट गुणधर्म रक्ताच्या गुठळ्या होण्यास रोखते. नसांच्या माध्यमातून शरीरातील सर्व भागातून रक्तप्रवाह सुरळीत होतो. हे संपूर्ण शरीरासाठी खूप चांगले असते.
कोलेस्ट्रॉल कमी होईल
जे लोक रोज साखरेऐवजी गुळाचे सेवन करतात त्यांच्या शरीरात साचलेले बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. त्याचबरोबर लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल
हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज असते. अन्यथा या दिवसांत सर्दी, खोकला आणि ताप या आजारांचे धोका वाढतो. अशातच जर तुमची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर तुम्ही नेहमी आजारी पडाल, त्यामुळं रोज गुळाचा एक खडा तरी चघळा.
शरीराला मिळेल उर्जा
गुळात आढळणारे पोषक तत्वांमुळं तो एक उर्जेचा स्त्रोतही आहे. गुळ खाल्ल्याने एनर्जी मिळते त्याचबरोबर रोजच्या जीवनातील कठिण परिस्थीती हाताळण्यास उर्जा मिळते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर
Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन
Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस
Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या
Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू
Revanth Reddy : अखेर ठरलं ! रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; हाय कमांडने केलं शिक्कामोर्तब