CM-Revanth-Reddy

Revanth Reddy : अखेर ठरलं ! रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; हाय कमांडने केलं शिक्कामोर्तब

861 0

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला, पण हाय कमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 7 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आणि मुख्यमंत्री नियुक्तीचा अंतिम निर्णय पक्षाच्या हाय कमांडवर सोडण्यात आला. या प्रकरणाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही पसंती रेवंत रेड्डी यांना असल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी रेवंत रेड्डी यांचे नाव अंतिम करण्यात आलं.

मात्र दुसरीकडे रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही वरिष्ठ नेत्यांनी विरोध दर्शवला होता. यामध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी, माजी सीएलपी नेते भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा समावेश आहे. रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती (BRS) चे पी नरेंद्र रेड्डी यांचा 32,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू

Sukhdev Singh Gogamedi : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची निर्घृणपणे हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!