नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण? ‘या’ दोन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा

273 5

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अजून मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे.

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्रीपदासंदर्भात जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं म्हणत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे.

दरम्यान आता नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार नाहीत अशी माहितीही मिळत आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी दोन मोठ्या चेहऱ्यांची चर्चा सध्या सुरू आहे.

उपमुख्यमंत्री पदासाठी कुणाची चर्चा? 

महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून मालेगाव मध्य मधून पाचव्यांदा विजयी झालेले व अनेक मंत्रिपदांचा अनुभव असणाऱ्या दादा भुसे यांचे नाव सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

दादा भुसे नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले व महाविकास आघाडी सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री राहिलेल्या उदय सामंत यांचं नावसुद्धा उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!