विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच चालू असलेली पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळात कोण असणार ? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं (ministry) मिळणार, याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यातच भाजप (BJP MLA) आता मंत्रीपदासाठीचे निकष (new rule) बदलणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळात ज्येष्ठ आमदारांना संधी न देता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. भाजप यावेळी मंत्रिमंडळ निश्चितीसाठी नवा फॉर्म्युला (formula) वापरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काय असेल नवा फॉर्म्युला ?
132 जागांवर विजय मिळवलेला भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी झाला आहे. त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल यात काही शंका नाही. मात्र मंत्रीपदांवर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आतापर्यंत ज्येष्ठ नेत्यांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत होती. मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार भाजप पक्षाच्या भविष्याचा विचार करत तरुण आमदारांना मंत्रिपदावर घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री भाजपचा असणार असल्याचे संकेत मिळत आहे. यावेळी भाजप 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान द्यायच्या विचारात आहे.
भाजप हा नेहमीच दूरदृष्टी असलेला पक्ष राहिला आहे. आत्ताच्या परिस्थितीपेक्षा भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा जास्त विचार भाजपकडून केला जातो. त्याचबरोबर अपेक्षित निर्णयांपेक्षा वेगळे निर्णय घेण्याचं धक्का तंत्र भाजपने कायमच अवलंबलं आहे. सभेत देखील भाजपने अशाच प्रकारचा निकष लावला होता. त्यामुळे 75 पेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना घरी बसावं लागलं. त्यामुळे भविष्यातील भाजपची फळी मजबूत करण्यासाठी नव्या नेत्यांना मंत्रिपदात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. तर ज्येष्ठ नेत्यांवर युवा नेत्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असेल.
या नेत्यांना मिळू शकतो डच्चू
अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाव मंत्रिमंडळात समावेशासाठी चर्चेत आहेत. मात्र भाजपने कमी वयाचा निकष लावल्यास मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या काही नेत्यांना याचा फटका बसू शकतो. त्यात मंदा म्हात्रे (वय 68), मंगलप्रभात लोढा (वय 68), चंद्रकांत पाटील (वय 65),राधाकृष्ण विखे पाटील (वय 65), गिरीश महाजन (वय 64), सुधीर मुनगंटीवार (वय 62), चंद्रशेखर बावनकुळे (वय 55), अतुल भातखळकर ( वय 59) रवींद्र चव्हाण (वय 54), यांचा समावेश आहे. यांच्या सहज अनेक नेत्यांना या निर्णयामुळे मंत्रिपदापासून दूर राहावं लागू शकतं.