महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अजून मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्रीपदासंदर्भात जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं म्हणत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे.
त्यामुळे राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुखकर झाला असून राज्यात पुन्हा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला राहण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्रीपद अनेक महत्त्वाची खाती दिली जातील असा कयास राजकीय वर्तुळात लावला जातोय.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार?
अर्थ
महसूल
कृषी
महिला बालविकास
ग्रामविकास
क्रीडा
अल्पसंख्यांक विकास
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणाला मिळू शकते मंत्रीपदाची संधी?
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
धनंजय मुंडे
आदिती तटकरे
इंद्रनील नाईक
अण्णा बनसोडे
माणिकराव कोकाटे
सरोज बाबुलाल अहिरे