Breaking News

HEALTH WELTH : मूळव्याधीने त्रास होतोय ? वाचा पथ्य आणि घरगुती उपाय

604 0

मुळव्याध हा खरंतर सामान्य आजार आहे ,असं म्हणायला हरकत नाही . परंतु तोपर्यंत जोपर्यंत यावर योग्य वेळी उपचार केले जात नाहीत.  कारण योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत तर हा आजार अत्यंत त्रासदायक सुद्धा ठरू शकतो. जर मूळव्याधीचा त्रास खूप जास्त असेल आणि अद्याप देखील तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतला नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात जाऊ शकता . त्यामुळे कोणतीही लाज न बाळगता वैद्यकीय उपचार घेण्यास सुरुवात करा. जर मूळव्याध अत्यंत त्रासदायक नसेल तर काही पथ्य आणि घरगुती उपाय आज सांगणार आहे . तत्पूर्वी कोणताही उपाय करताना योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मुळव्याध हा उष्ण प्रकृतीमुळे होणारा आजार आहे . शरीरातील अधिक उष्णता यामुळे गुरुद्वारा जवळ कोंब येणे, चीर पडणे हे मुळव्याधीचे प्रकार आहेत त्याविषयी सविस्तर आपण पुढच्या लेखामध्ये पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुद्वारा जवळ होणारी जळजळ किंवा स्पर्शाने जाणवणारा कोंब असेल आणि अद्याप देखील तुम्ही या विषयावर कोणाशीही बोलले नसाल तर सर्वात पहिले कोणतीही लाज न बाळगता बोला हा अत्यंत सामान्य आजार आहे .
1. उष्ण प्रकृतीमुळे मूळव्याध होऊ शकते त्यामुळे विशेष करून उष्ण प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी उष्ण पदार्थ जसे की अंडे मासे चिकन चहा अति तिखट पदार्थ खाणे टाळावे
2. उष्ण प्रकृतीसह जेवणाच्या आणि खानपानाच्या अयोग्य सवयींमुळे देखील मुळव्याधीचा त्रास होतो . त्यामुळे जेवणाच्या वेळा आणि जंक फूड खाणे कमी करा.
3. थंड प्रवृत्तीचे पदार्थ खावेत . अर्थात मुळा ,काकडी या भाज्या तसेच केळी, पेरू, कलिंगड ही थंड प्रकृतीची फळे आहेत . तर आंबा हे उष्ण प्रकृतीचे फळ आहे.
4. ताक प्यायल्याने आराम मिळू शकेल. त्यासह लिंबू सरबत देखील चांगले . भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे…
5. जर मूळव्याधीचा कोंब अधिक त्रास देत असेल तर त्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार थंडावा देईल असे एखादे क्रीम किंवा जेल लावल्याने तात्काळ लगेच आराम मिळू शकतो . त्यासह कोरफड जेलचा देखील उपयोग करू शकता .

Share This News
error: Content is protected !!