गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी

523 0

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केला आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास ४ ऐवजी ५ दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सुट दिलेल्या गणेशोत्सवाखेरीज इतर सण, उत्सव तसेच ठेवून जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी शनिवार, ३ सप्टेंबर, रविवार, ४ सप्टेंबर, मंगळवार ६ सप्टेंबर, बुधवार ७ सप्टेंबर आणि शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एकूण ५ दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

पुणे जिल्ह्यातील मावळ-हवेलीतील 6 बड्या ‘प्लॉट डेव्हलपर’वर गुन्हे दाखल

Posted by - April 12, 2022 0
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि हवेली तालुक्यात अनधिकृत प्लॉटींग करुन जागामालक व विकसक हे विक्री, विकसनाचे काम करत असल्याचे पुणे महानगर…

रियल इस्टेट एजंट म्हणून काम करण्याचा विचार करताय ? यापुढे महारेराची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, ही बातमी वाचाच

Posted by - January 14, 2023 0
महाराष्ट्र : रियल इस्टेट एजंटसच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगता आणण्यासाठी नियमक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी…

‘गुढीपाडवा जल्लोषात साजरा करणारच’, राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Posted by - March 31, 2022 0
मुंबई- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा साजरा होणार आहे. मात्र ठाकरे सरकार या सणासाठी निर्बंध घालण्याचा विचार करतय.…

महाडमध्ये आईने 6 मुलांना दिले विहिरीत फेकून, सर्वांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 31, 2022 0
रायगड- महाड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. या घटनेत…
Mumbai High Court

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Posted by - January 17, 2024 0
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) एका विवाहित महिलेने तिच्या पतीविरोधात दाखल केलेल्या गुन्हा रद्द करताना एक महत्त्वपूर्ण असं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *