मायग्रेन ही एक न्युरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणात दुखू लागतो. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो. एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते.मायग्रेनमध्ये तुम्हाला मळमळ अथवा उलटीचा त्रासही होण्याची शक्यता असते. काही वेळा मायग्रेनमुळे तुमचे डोके जोरजोरात थडथडत आहे असे वाटू लागते. काही जणांचा रक्तदाबही यामुळे वाढू शकतो. मात्र काहीही असलं तरी या समस्येवर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. डॉक्टरांकडून तपासणी केल्यावरच तुमची डोकेदुखी मायग्रेनमुळे होणारी आहे का हे समजू शकतं. कारण प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन असेलच असे नाही. शिवाय प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनच्या त्रासाचे कारण निरनिराळे असू शकते. मायग्रेन एक अनुवंशिक समस्या आहे. मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.
काय आहेत मायग्रेनची लक्षणे
1. उच्च रक्तदाब
2. अपूरी झोप
3. ताण-तणाव
4. अधिक प्रमाणात पेनकिलर घेणं
5. वातावरणातील बदल
6. ॲलर्जी
7. धूर
8. हॉर्मोन्समधील बदल
9. धुसर दिसू लागणे
10. काही विशिष्ट खाद्यपदार्थांची ॲलर्जी असणे
मायग्रेन दूर करण्यासाठी उपाय
जर तुमचं डोकं मायग्रेनमुळे दुखत असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. शिवाय काही घरगुती उपचार करून देखील तुम्ही तुमची डोकेदुखी कमी करू शकता.
1. साजूक तूप – मायग्रेन कमी करण्यासाठी नियमित तुमच्या नाकपुडयांमध्ये दोन थेंब शुद्ध तूप टाका.
2. लवंग पावडर – डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दुधात लवंग पावडर मिसळून ते घेऊ शकता.
3. सफरचंद – मायग्रेनच्या त्रासातून वाचण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक सफरचंद खा
4. पालक आणि गाजराचा रस- मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल तर पालक आणि गाजराचा रस घ्या.
5. लिंबाची साल – लिंबाची साले सुकवून त्याची पावडर तयार करा. डोके दुखू लागल्यास या पावडरची पेस्ट कपाळावर लावा. ज्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकेल.
मायग्रेनपासून वाचण्यासाठी उपाय
मायग्रेनचा अटॅक कधीही येऊ शकतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी सतत सावध असणं फार गरजेचं आहे. आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर मायग्रेनच्या त्रासापासून वाचणं नक्कीच शक्य आहे.
1. कडक उन्हात घराबाहेर पडू नका
2. उग्र वासाचे परफ्युम लावू नका
3. प्रखर उजेडात काम करू नका. झोपताना दिवे बंद करा.
4. पुरेशी झोप घ्या. झोपमोड होणार नाही याची दक्षता घ्या. यासाठी झोपण्यापूर्वीच आजूबाजूचे वातावरण शांत
ठेवण्यासाठी घरच्यांना विनंती करा.
5. ताण- तणावामुळे मायग्रेन वाढण्याची अधिक शक्यता असते. दैनंदिन जीवनात अनेक समस्या आणि चिंताना तोंड द्यावे लागते. म्हणूनच नियमित मेडीटेशन करा. योगा आणि व्यायामामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल.
6. कमी प्रकाशात डोळ्यांवर ताण येईल असे काम करणे टाळा.
7. दररोज कमीत कमी 12-15 ग्लास पाणी प्या. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.
8. वातावरणात बदल झाल्यामुळे मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. यासाठी अचानक थंड वातावरणात जाणे टाळा शिवाय उन्हाळ्यात थंड पाणी पिऊ नका.
9. उन्हाळ्यात अती घाम सुटेल असे गरम पदार्थ जसे की गरमागरम कॉफी अथवा वाफाळता चहा नका घेऊ.
टीप : वरील कुठलाही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.