Rekha Boj

World Cup 2023 : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर मी विवस्त्र होऊन..; ‘या’ अभिनेत्रीचे अजब वक्तव्य

750 0

मुंबई : सध्या सगळीकडे वर्ल्ड कपची (World Cup 2023) धामधूम सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ फायनलमध्ये एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर ठाकले आहेत. या सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच एका अभिनेत्रीने टीम इंडियाच्या विजयावरून अजब घोषणा केली आहे.

काय केली घोषणा ?
या अभिनेत्रीचं नाव आहे रेखा बोज असे आहे. ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करते. जर टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर समुद्रकिनारी विवस्त्र धावणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे. रेखा बोजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्ल्ड कपशी संबंधित हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणतेय की, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, तर मी वैजाग बीचवर विवस्त्र धावेन. रेखाने हा व्हिडीओ फेसबुकवरही शेअर केला आहे. रेखाने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘मंगलयम’, ‘स्वाती चिनुकू संध्या लेलालो’ आणि ‘कलाय तस्मै नम:’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

वनडे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियापुढे रविवारी ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी पाच वेळा जेतेपद पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं जातं. त्यामुळे टीम ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाची अंतिम लढत पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

युक्रेन रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावला अभिनेता सोनू सूद

Posted by - March 5, 2022 0
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध पाहता जग सध्या चिंतेत आहे. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता, अनेकांना युद्धाच्या काळात देशात अडकलेल्या…

Boycott Liger trends on Twitter : ‘Self-Made’ स्टारला पाठिंबा न दिल्याबद्दल विजय देवेराकोंडाच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना फटकारले

Posted by - August 20, 2022 0
ट्विटरवर ‘बॉयकॉट लायगर’ हा नवीन ट्रेंड सुरु आहे. विजय देवेराकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूड चित्रपटाला ट्रॉलर्स…

“2 अक्तूबर को क्या हुआ था ?” विजय साळगावकर करणार का ‘त्या’ गुन्ह्याचे कन्फेशन ? ‘दृश्यम 2’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Posted by - September 29, 2022 0
‘दृश्यम 2’ : अजय देवगन या अभिनेत्याच्या दृश्यम या चित्रपटाने 2015 मध्ये धुमाकूळ घातला होता. थ्रिलर सस्पेन्सने परिपूर्ण असा हा…
Team India

Team India : टीम इंडियाने फायनलमध्ये बांग्लादेशाचा धुव्वा उडवत आशिया कपवर कोरले नाव

Posted by - June 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाच्या ( Team India ) महिला संघाने स्वतःच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वुमन्स…
IND Vs AUS

Ind Vs Aus : मेगाफायनलला पावसाने घोळ घातल्यास विजेता कोण होणार? ICC चा नियम काय सांगतो?

Posted by - November 18, 2023 0
मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील फायनलची सगळे क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. उद्या रविवारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *