माळीण दुर्घटनेचा थरार आता मोठ्या पडद्यावर ; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

229 0

जुन्नर तालुक्यातील माळीण गावात २०१४ मध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवर आधारित एक होतं माळीण या चित्रपटातून ती घटना २९ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे.

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण अरुण कोंजे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती. एक संपूर्ण गावच एका रात्रीत नाहीसं झालं होतं. या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक हळूवार आणि हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उत्तम संहिता, दमदार कलाकार आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत.

https://www.instagram.com/p/CcMyCH-JdzR/?utm_source=ig_web_copy_link

मराठी चित्रपटात उत्तमोत्तम कथा असलेले चित्रपट येत असतात. त्यात आता “एक होतं माळीण” या चित्रपटाचीही भर पडणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन नव्यानं कथानक लिहिलं गेलं आहे. मोठ्या मेहनतीनं हा चित्रपट साकारला असून आता २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Share This News

Related Post

#अमरावती : शिक्षक मतदार संघाचा 30 तासानंतर निकाल जाहीर; महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

Posted by - February 3, 2023 0
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील विजयी झाले आहेत. धिरज लिंगाडे यांचा विजय निश्चित मानला…

ACB TRAP : 3 लाखाच्या लाचेची मागणी; 2 लाखाचे सेटलमेंट; पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Posted by - December 30, 2022 0
पिंपरी : पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस (वय वर्षे 3१) तीन लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.…

भर सभेत अजित पवार यांनी मोदींकडे केली राज्यपालांची तक्रार

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांची एमआयटीच्या मैदानात सभा झाली. या सभेत…

‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ विरोधात पुणे RTO ची आजपासून विशेष मोहीम

Posted by - December 1, 2022 0
पुणे : पुणे शहरात बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सीवर आता धडक कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी ‘आरटीओ’कडून 12 मोटार वाहन निरीक्षकांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *