लग्नसमारंभात नवऱ्या मुलाला भेट दिले लिंबू ; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

412 0

गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात लिंबाच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांची चव ‘आंबट’ करत आहेत. लिंबाच्या दरात वाढ झाल्याने देशाच्या अनेक भागांत लिंबू  400 रुपये प्रतिकिलो भावाने विकले जात आहे.

अनेक ठिकाणी एकच लिंबू 10 ते 15 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता लग्नातही लोक लिंबू भेट म्हणून देत आहेत.

गुजरातमधील राजकोटमधील धोराजी शहरात लग्न समारंभात लोकांनी वराला लिंबू गिफ्ट म्हणून दिले. आयुष्यातील सर्वात खास दिवशी वधू-वरांना लिंबू भेट देणाऱ्या व्यक्तीचे नाव दिनेश आहे. दिनेशच्या म्हणण्यानुसार, ‘सध्या लिंबाच्या किमती संपूर्ण देशापेक्षा गुजरातमध्ये खूप वाढल्या आहेत. या उन्हाळ्यात लिंबाची खूप गरज असते. त्यामुळे खूप विचार करून हा निर्णय घेतला.’

शहरातील मोनपरा कुटुंबातील मुलाच्या लग्न समारंभात मित्रांनी मिठाईच्या डब्यात पैसे किंवा दागिन्यांऐवजी महागडे लिंबू भेट दिले. लिंबूचे मूल्य इतके वाढले आहे की, ते आता महागडे गिफ्ट म्हणून दिले जाऊ शकते. ही खास भेट पाहून लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

Share This News

Related Post

Yes Bank and DHFL fraud case : संजय छाब्रियांची 251 कोटी ; तर अविनाश भोसलेंची 164 कोटींची मालमत्ता जप्त ,लंडनमधील ‘ती’ इमारत वादाच्या भोवऱ्यात

Posted by - August 3, 2022 0
पुणे : ईडीने पीएमएलए 2002 अंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता…

ओळख पाहू …. या चित्रात काय दिसतंय ? त्यावरून समजेल तुमची पर्सनॅलिटी

Posted by - April 13, 2023 0
तुमचे व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचा स्वभाव कसा आहे हे ओळखण्याची एक पद्धत आहे. त्याला ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे भ्रमित…

मोठी बातमी : तुकाराम मुंढे यांची साईबाबा संस्थानच्या सीईओपदी नियुक्ती

Posted by - November 30, 2022 0
शिर्डी : आपल्या शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वामुळे स्वतःसह आपल्या कामकाजाच्या वर्तुळात काम करणाऱ्या सर्वांनाच शिस्तीचे धडे शिकवणारे बेधडक अधिकारी तुकाराम मुंढे यांचे…

#PUNE CRIME : पुण्यात पीएमपी बस वाहकाचे तरुणीसोबत असभ्य वर्तन; गुन्हा दाखल

Posted by - February 21, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीएमपी बस वाहकाने एका 22 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला…

काँग्रेस नेते अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना आला मेसेज

Posted by - January 28, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *