शिक्षिकेने पोस्ट केले Bikini तील फोटो Instagram वर ; सोडावी लागली नोकरी ; त्यानंतर घडले असे काही….

564 0

कलकत्ता : कलकत्त्यातील या प्रकरणाची चर्चा सध्या सुरू आहे . तर प्रकरण आहे एका महिला प्राध्यापिकेविषयी जिने आपल्या वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंट वरून आपले बिकनीतील फोटो शेअर केले होते . त्यानंतर हे फोटो व्हायरल झाले , तिच्या या व्हायरल फोटो विषयी विद्यापीठातील पालकांनी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाने या महिला प्राध्यापिकेला राजीनामा मागून घेतला . अर्थात तिला नोकरीवरून कमी केले. ही घटना घडली होती 2021 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये…

त्यानंतर या महिलेने राजीनामा दिला परंतु आता या महिला प्राध्यापिकेने आपल्या बिकनीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्याने नक्की नुकसान कोणाचे झाले आहे हाच खरा मुद्दा आहे.

तर हे प्रकरण आता कोर्टात गेलं असल्याचं समजत आहे या महिलेने कलकत्ता हायकोर्टात रिट याचिका दाखल करणार असल्याचे सांगून विद्यापीठाने माफी मागावी आणि तिचे प्रतिमा हनन केल्या कारणाने तिला 99 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ती करणार आहे
याप्रकरणी जाडा व पूर पोलीस ठाण्यात या महिला प्राध्यापिकेने तक्रार दाखल केली होती त्यासह तिचे इंस्टाग्राम अकाउंट ठराविक लोकांसाठी मर्यादित असताना हे फोटो अशा पद्धतीने व्हायरल कसे झाले या प्रकरणी देखील तिने तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत याप्रकरणी एकंदरीत आता काय निर्णय घेतला जातो हे लवकरच समजेल

Share This News
error: Content is protected !!