ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

375 0

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

80, 90 च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती राहिली आहे.

चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच सुप्रसिद्ध आहेत. प्रेमा किरण यांनी उतावळा नवरा, थरकाप या चित्रपटांची निर्मिती देखील केली. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेत त्यांनी काम करत चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

गायिका कनिका कपूर पुन्हा अडकली लग्नबंधनात

Posted by - May 20, 2022 0
बॉलिवूडच्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचे मनं जिंकणारी कनिका कपूर लग्नबंधनात अडकली आहे. कनिकाचे मेहेंदीपासून ते प्रि वेडिंग शूटचे अनेक फोटो समोर…

बगळ्याची शिकार करणाऱ्या मुलांवर सयाजी शिंदे संतापले!

Posted by - June 19, 2022 0
  मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सयाजी शिंदे यांनी चित्रपटांमध्ये अनेक वेळा नकारात्मक…
Babasaheb Patil

Marathi Film Association : मराठी चित्रपट असोसिएशनच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती

Posted by - October 10, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र हे कलाक्षेत्रातील (Marathi Film Association) अग्रगण्य राज्य आहे. चित्रपट क्षेत्रात लाखो कलाकार काम करतात. दरम्यान कलाकाराच्या हितासाठी…

दीपिका रणवीरच्या घरी नवा पाहुणा येणार, बाळाचे नाव काय ठेवणार ?

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- बॉलिवूडमधील मोस्ट स्वीट कपल म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघेही एकमेकांविषयी नेहमी…

आतुरता संपली !….सरसेनापती हंबीरराव “या” होणार प्रदर्शित पाहा टिझर

Posted by - March 15, 2022 0
सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, आणि जबरदस्त आवाजाने आपल्या सगळ्याचे लक्ष वेधुन घेणारे अभिनेते प्रविण तरडे यांच्या अगामी चित्रपटाबद्दल नवीन बातमी समोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *