पुण्यातील पेशवे उद्यान हे तब्बल दोन वर्षांनंतर आज महाराष्ट्र दिनापासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर 90 टक्के उद्यानं सुरू करण्यात आली होती मात्र पेशवे उद्यान अद्यापही बंदच होतं. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज हे उद्यान खुलं करण्यात आलं.
सारसबागेशेजारील पर्वती मंदिर टेकडीच्या सान्निध्यात वसलेलं महापालिकेचं पेशवे साहसी उद्यान लहान मुलांसाठी पर्वणी आहे. या उद्यानास ऐतिहासिक वारसा आहे. हे उद्यान लवकरात लवकर खुलं व्हावं, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात होती.