SUDHIR RASAL: साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा; मराठीसाठी सुधीर रसाळ यांना पुरस्कार, वाचा पुरस्कारांची यादी

SUDHIR RASAL: साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा; मराठीसाठी सुधीर रसाळ यांना पुरस्कार, वाचा पुरस्कारांची यादी

1546 0

अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने 20 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात मराठीत भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ (sudhir rasal) यांना जाहीर झाला आहे. 8 मार्च 2025 रोजी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

साहित्य अकादमीने 21 भाषांमधील तीन कादंबऱ्या, 8 काव्यसंग्रह, 2 लघुकथा संग्रह, तीन साहित्य समीक्षक, एक नाटक आणि एक संशोधनासाठी पुरस्कार जाहीर केला. यामध्येच ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना देखील हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कारांची यादी

मराठी-सुधीर रसाळ, कोंकणी-मुकेश थाली, आसामी- समीर तांती, हिंदी – गगन गिल, इंग्लिश -इस्टरिन किर, गुजराती – दिलीप झवेरी, बोडो- अरोन राजा, कन्नड- केव्ही नारायणा, मैथिली – महेंद्र मलांगिया, मल्याळम – जयकुमार, तेलुगु – पेनुगौंडा लक्ष्मीनारायण, काश्मिरी-सोहन कौल, ओडिया – वैष्णव चरण समल, मणिपूरी – हाओबम सत्यवती देवी, नेपाळी – युवा बराल, राजस्थानी-मुकुट मनिराज, पंजाबी – पॉल कौर, सैंतली – महेश्वर सोरेन, संस्कृत – दीपक कुमार शर्मा, तामिळ – एआर व्यंकटचलपथी, सिंधी – हुंदराज बलवानी

पुरस्काराचं स्वरूप

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जातं.

कोण आहेत सुधीर रसाळ?

डॉ. सुधीर रसाळ हे 91 वर्षांचे असून पूर्वी ते मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते. त्याचबरोबर ते समीक्षक आणि लेखक देखील आहेत. विं.दा. करंदीकर गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ते सातत्याने लेखन करत असतात. अलीकडेच त्यांच्या सोळाव्या पुस्तकाचं प्रकाशनही पार पडलं आहे.

हेही वाचा:

BADLAPUR CASE: बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण; कर्तव्यात कसूर करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं निलंबन 

https://www.topnewsmarathi.com/crime/badlapur-case-invistigation-completed-and-a-lady-police-officer-suspended/

PUNE CRIME: शिक्षणाच्या माहेरघरात चाललंय काय ? नामांकित शाळेतील शिक्षकाकडून 10 व 11 वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

https://www.topnewsmarathi.com/crime/ten-and-eleven-year-old-students-sexually-assaulted-by-a-teacher-in-a-reputed-school-of-pune/

Share This News
error: Content is protected !!