पुणे पुस्तक महोत्सव व्हावा सामाजिक महोत्सव

247 0

महाराष्ट्रात पुण्याचे स्थान महत्त्वाचे आहे. पुण्याचे नाव होते तेव्हा महाराष्ट्राचे नाव होते. महाराष्ट्राचा लौकिक वाढतो तेव्हा देशाचा लौकिक वाढतो. पुणे पुस्तक महोत्सव येत्या काळात हा एक सामाजिक महोत्सव व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुणे पुस्तक महोत्सवाला प्रधान यांनी मंगळवारी भेट दिली. एमबीटीचे संचालक
युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, डॉ. आनंद काटीकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत या वेळी उपस्थित होते.

प्रधान म्हणाले, की हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आहे, ही मराठीजनांसाठी महत्त्वाची घटना आहे. भारतीय संस्कृतीत पुण्याचे स्थान महत्त्वाचे आहे. संस्कृती चिरंतन राहण्यात भाषा, संस्कृतीचे महत्त्वाचे असते. त्यासाठी पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे. समाजजीवनाची निरंतरता पुस्तक आहे. आई-वडिलांनंतर पुस्तक हा व्यक्तीचा सोबती असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय भाषांना महत्त्व देण्यात आले आहे. देशात २६ भाषा अनुसूचित आहेत. नवजात बालकाच्या कानावर मातृभाषेतील शब्द पडतात, त्यानंतर ते मुल मातृभाषेत बोलू, लिहू, वाचू लागते. या प्रवासात पुस्तक महत्त्वाचे ठरते. पुणे पुस्तक महोत्सवाला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो ही फारच मोलाची बाब आहे.

Share This News
error: Content is protected !!