Priya Berde

Priya Berde : प्रिया बेर्डें छोट्या पडद्यावर ‘या’ मालिकेतून करणार कमबॅक

565 0

‘सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ही मालिका असणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) तब्बल 7 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ‘सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची’ या मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्या पार्वती साठे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ या मालिकेत अभिनेत्री अनन्या टेकवडे चिंधीची भूमिका साकारणार आहे. तर छोट्या पडदा गाजवणारा किरण माने (Kiran Mane) या मालिकेत अभिमान साठे म्हणजेच चिंधीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चिंधीची आई म्हणजेच हिरु साठेच्या भूमिकेत अभिनेत्री योगिनी चौक दिसणार आहे. तसेच प्रिया बेर्डे या मालिकेत चिंधीच्या आजीच्या म्हणजेच पार्वती साठेच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘या’ दिवशी सुरु होणार मालिका ?
‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

प्रिया बेर्डें यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘अशी ही बनवाबनवी’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. एक धागा, आम्ही तिघी या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. प्रिया बेर्डे या अभिनेत्री असण्यासोबत निर्मात्यादेखील आहेत. अभिनयासोबत त्या राजकारणातदेखील सक्रिय आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीसोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!