जेव्हा कधी आपल्याला उचकी (Hiccups) येते तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपली आठवण काढत आहे. पण हीच जर उचकी (Hiccups) जास्त किंवा वारंवार येत राहिली तर खूप चिडचिड होते. पण उचकी येणं हे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर मात्र, आता काळजी करण्याचे कारण नाही. उचकी येण्याची नेमकी कारणं कोणती आणि ते थांबवण्याचे उपाय नेमके कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया…
कशामुळे लागते उचकी?
जास्त मद्यपान आणि धूम्रपान केल्याने उचकी येऊ शकते.
अस्वस्थता हे एक कारण आहे.
जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अति ताण घेतला तर उचकी येऊ शकते.
काहीवेळा तुम्ही अतिउत्साहीत असलात तरी उचकी येऊ शकते.
हवेच्या तापमानातील बदलांमुळे देखील उचकी येऊ शकते
अन्न चघळल्याशिवाय खाल्ल्यानेही उचकी येऊ शकते.
जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उचकी येऊ शकते.
अपचनामुळे देखील उचकी येऊ शकते.
उचकी (Hiccups) थांबवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा
उचकी थांबवण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात काही पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ घाला. हे पाणी प्यायल्याने गॅसपासून आराम मिळेल आणि उचकी देखील दूर होतील.
एक चतुर्थांश हिंग पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा बटर मिसळून खावे. हे खाल्ल्याने हिचकी थांबते
सुंठ आणि मायरोबलन पावडर एकत्र करून एक चमचा पावडर पाण्याबरोबर घेतलयास आराम मिळेल.
वेलचीचे पाणी देखील उचकी थांबवण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी 2 वेलची पाण्यात उकळा आणि ते पाणी प्या
मध खाल्ल्यानेही उचकीवर नियंत्रण ठेवता येते.