Prashant Damle

Prashant Damle : प्रशांत दामले यांच्या मातोश्री आई विजया दामले यांचं निधन

10045 0

मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई विजया दामले यांचं आज (बुधवार) सकाळी 10 वाजताच्या सुमारास निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रशांत दामले हे काही कामानिमित्त मुंबईबाहेर होते. तेव्हा त्यांना आईच्या निधनाचं वृत्त समजलं. त्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

प्रशांत दामले यांच्याविषयी बोलायचे झाल्यास हे नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रशांत दामले हे त्यांच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगसाठी जवळपास महिनाभर अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. येत्या 8 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर असा महिनाभर हा दौरा होता. काही महिन्यांपूर्वीच प्रशांत दामले यांनी 12 हजार 500 व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठला होता.

निर्मिती क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय आहेत. प्रशांत फॅन फाऊंडेशन ही त्यांची स्वत:ची संस्था आहे. या संस्थेद्वारे ते अनेक सामाजिक कार्य करतात. महाराष्ट्र शासनाच्या जल कार्यक्रमासाठी त्यांनी एक लाख रुपये दिले होते. प्रशांत दामले हे गेली तीन दशके मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत.

Share This News
error: Content is protected !!