G20 परिषदेच्या (G20 Parishad) बैठकीसाठी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिंनुबा हे भारतात दाखल (G20 Parishad) झाले आहेत. त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, नायजेरियाच्या अध्यक्षांच्या स्वागतावेळी मराठी गाणं लावण्यात आलं होतं. या प्रसंगाचा व्हिडिओ सिद्धांत सिबल या एक्स (ट्विटर) हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे.
Marathi songs welcomed Nigerian President Bola Ahmed Tinubu in Delhi earlier today: pic.twitter.com/pS4XdNKe37
— Sidhant Sibal (@sidhant) September 5, 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी पालम येथील लष्करी हवाई अड्ड्यावर बोला यांचं स्वागत केलं. जी-20 शिखर परिषदेमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी कित्येक देशांचे अध्यक्ष येणार आहेत. यांपैैकी सर्वात प्रथम बोला यांचं आगमन झालं आहे.या वेळी नायजेरियाचे परराष्ट्र मंत्री युसूफ तुग्गर आणि भारतातील नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुले हेदेखील उपस्थित होते. नवी दिल्लीमध्ये ९ आणि 10 सप्टेंबर रोजी G20 बैठक पार पडणार आहे. या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.