Prashant Damle

Prashant Damle : प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

831 0

मुंबई : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार यंदा अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना जाहीर झाला आहे. यंदा दिले जाणारे हे 56 वे गौरव पदक आहे.

5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रधान केला जाणार आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25,000 हजार स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या गौरवपदकाचे स्वरूप आहे. विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

प्रशाांत दामले हे अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असण्यासोबत लोकप्रिय अभिनेते आहेत. गेली चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट, आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. अभिनेते असण्यासोबत ते गायक, पार्श्वगायक आणि नाट्यनिर्मातेही आहेत. त्यांनी फेब्रुवारी 1983 पासून आजपर्यंत 12500 पेक्षा अधिक नाटकांचे प्रयोग केले आहेत. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत.

Share This News
error: Content is protected !!