Chandra Mohan

Chandra Mohan : दाक्षिणात्य अभनेते चंद्र मोहन यांचे निधन

824 0

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता, कॉमेडियन मल्लमपल्ली चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 9.45 वाजता हैद्राबादनमध्ये असलेल्या जुबली हिल्स परिसरातील एका प्रायव्हेट रुग्णालयात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. मल्लमपल्ली चंद्र मोहन हे 82 वर्षांचे होते. चंद्र मोहन यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

चित्रपटसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मल्लमपल्ली चंद्र मोहन यांच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त केला आहे. मल्लमपल्ली चंद्र मोहन यांच्या कुटुंबात आता दोन मुली आहेत. मल्लमपल्ली चंद्र मोहन हे दिग्गज दिग्दर्शक विश्वनाथ यांचे चुलत भाऊ होते. मल्लमपल्ली चंद्र मोहन यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्या निधनावर वेंकटेश दग्गुबाती, नानी, राम चरण आणि साई धरम तेज सारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

मल्लमपल्ली चंद्र मोहन यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या कृष्णा जिल्ह्याच्या पमिदिमुक्कुला गावात झाला होता. तर त्यांचं खरं नाव चंद्रशेखर राव मल्लमपल्ली आहे. त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगुला रत्नम’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी श्रीदेवी, जया प्रदा, जयासुधा सारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत काम केले आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे चंद्र मोहन यांना बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांनी 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पदाहारेला वायसु’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!