विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नंदेश विठ्ठल उमप यांनी केली आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यंदाचा 13 वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या 26 नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी 6.00 वा संपन्न होणार आहे.
कोणाकोणाचा करण्यात येणार गौरव ?
सुदेश भोसले (संगीत विभाग), आतांबर शिरढोणकर (लोकसंगीत), अनुराधा भोसले (सामाजिक कार्य), सुमित राघवन (अभिनय क्षेत्र), चिन्मयी सुमित (अभिनय क्षेत्र), केतकी माटेगावकर (नवोन्मेष) या मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
सोहळ्याला कोण कोण राहणार उपस्थित?
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे, श्रीमती नीलम गोऱ्हे (उपसभापती ), श्री. उदय सामंत (उद्योग मंत्री), अॅड आशिष शेलार (भाजपा, मुंबई अध्यक्ष), श्री.अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे), श्री.अभिजीत बांगर (आयुक्त, ठाणे), श्री. संदीप माळवी (अतिरिक्त आयुक्त, ठाणे) आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.