Subhedaar Movie Teaser

Subhedar Trailer : राजं आधी लगीन कोंढाण्याचं… ‘सुभेदार’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

412 0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देण्याऱ्या मावळ्यांचे योगदान देखील खूप महत्त्वाचे आहे. अशाच एका शूरवीराची कथा लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नवीन चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. दिग्पाल लांजेकर यांचा ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ‘सुभेदार’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात कोंढाणा किल्ल्यापासून होते. हा ट्रेलर पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार आहे. चाहत्यांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Share This News
error: Content is protected !!