सोलापूर : सोलापुरामधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या (Solapur News) केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
काय घडले नेमके?
हणमंत विठ्ठल काळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते सोलापूरमधील खासगी शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. जवळपास 13 वर्षांपूर्वी हणमंत काळे हे शिपाई म्हणून भरती झाले, शालार्थ आयडी नसल्याने एकदाही त्यांचा पगार झाला नाही. याच तणावातून त्यांनी शेततळ्यात उडी मारुन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलांसह शेततळ्यात उडी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलांनी उडी मारण्याआधी कुटुंबीयांनी त्याला रोखलं तर मृत शिपायाची पत्नी मात्र गंभीर असून सध्या सोलापुरातील खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, शालार्थ आयडीसाठी काही अधिकाऱ्यांनी हणमंत काळे यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती, पैसे न दिल्यानेच शालर्थ आयडी दिला नाही.. असा आरोप वडील विठ्ठल काळे यांच्याकडून करण्यात आला आहे.