Pengaon Pass Away

साऊथ अभिनेता हरीश पेंगनचं वयाच्या 49 व्या वर्षी निधन

609 0

मुंबई : मल्याळम चित्रपट अभिनेता हरीश पेंगन यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले आहे. यामुळे चित्रपटसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. त्यांचे 30 मे रोजी निधन झाले आहे. हरीश पेंगन आजारी होते. त्यांना यकृताच्या समस्येशिवाय त्याला आणखी काही गंभीर समस्या होत्या, ज्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पोटदुखीच्या तक्रारीनंतर हरीश पेंगनला मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर काही चाचण्या करण्यात आल्या, त्यानंतर हरीश पेंगनची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले. यामुळे हरीशचे यकृत प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अभिनेत्याची बहीण हिनेही यकृत दान करण्यास होकार दिला होता. मात्र यकृत प्रत्यारोपणासाठी 30 लाख रुपयांची गरज होती. यासाठी हरीशची बहीण आणि मित्रांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. पण त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांनी 30 मे रोजी दुपारी 3.25 वाजता अखेरचा श्वास घेतला. ही बातमी समजताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांपासून ते अनेक सेलेब्सपर्यंत सर्वांनी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता हरीश पेंगन यांची कारकीर्द
हरीश पंगनने ‘महेशिनते प्रथिकारम’, ‘हनी बी 2.5’, ‘जानेमन’, ‘जया जया जया जया हे’, ‘मिन्नल मुरली’ आणि ‘मिनल मुरली’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हरीश पंगन याच्यावर कोची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Share This News
error: Content is protected !!