Kolhapur Crime

मधुमेहाच्या औषधाने केला घात? बायकोने किचनमध्ये तर पतीने भररस्त्यात सोडले प्राण

28173 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध पती- पत्नीच्या जीवावर बेतले आहे. हे दाम्पत्य कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील रहिवाशी आहे. मधुकर दिनकर कदम (वय 59 ) (Madhukar Dinkar Kadam) व जयश्री मधुकर कदम (Jayshree Madhukar Kadam) असे पती-पत्नीचे नाव आहे. वडणगे येथील दिंडे कॉलनीमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होते. आयुर्वेदिक औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांच्या मुलीने वर्तवली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
वडणगे येथील दिंडे कॉलनीत राहणारे कदम दाम्पत्य हे मूळचे शिवाजी पेठेतील आहेत. मधुकर कदम हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी ते आपल्या दोन मुलींसह नवीन घरात राहायला आले होते. वय झाल्याने पती पत्नींना काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू झाला होता. पंधरा दिवसांपूर्वी मधुमेहाचा त्रास अधिक वाढल्याने दोघांनीही मुक्त सैनिक वसाहत येथील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. आज सकाळी दोघांनी औषधी पावडर पाण्यात मिसळून घेतली.

नंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या. यानंतर काही वेळाने जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळात त्या बेशुद्ध पडल्या. तर तिकडे दूध आणण्यासाठी गेलेल्या शिवपार्वती चौकातील डेअरीत मधुकर कदमही चक्कर येऊन पडले. यावेळी नागरिकांनी कदम दाम्पत्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. या दाम्पत्याला 19 वर्षाची गायत्री कदम आणि 17 वर्षाची विजया कदम या दोन मुली आहेत. या घटनेमुळे दोघींवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Related Post

“चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला…!” ; उद्धव ठाकरेंची सडेतोड प्रतिक्रिया

Posted by - March 24, 2023 0
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश…

पुणेकरांसाठी महत्वाची माहिती : डेक्कन व चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक, पार्कींग व्यवस्थेत बदल

Posted by - February 13, 2023 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने डेक्कन वाहतुक विभागाअंतर्गत चैत्राली को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड ते क्षितीज…
Mumbai News

Mumbai News : भारतीय शूटरच्या मदतीने दहशतवादी हल्ला करणार; मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai News) वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये आज पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला. मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला…

थुंकल्यावर घाण अंगावर उडाली म्हणून जाब विचारणाऱ्या ज्येष्ठाची जबर मारहाण करून हत्या; डोंबिवलीतील खळबळजनक घटना

Posted by - December 12, 2022 0
डोंबिवली : डोंबिवलीतील चिचोंड्याचा पाडा या परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विजय पटवा वय वर्षे 52 हे डोंबिवली…

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विषमता समाप्त करण्यासाठी कार्ययोजना आखून काम करत आहेत – केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

Posted by - October 13, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार गावे , गरीब आणि शेतकरी यांचा विकास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने काम करत आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *