मनोरंजन

मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्या मागचं धक्कादायक कारण आलं समोर

 

अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. बुधवारी सकाळी त्यांनी आयशा मनोर या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. व शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान आता अनिल मेहता यांनी आत्महत्या नेमकी का केली ? याबाबतची माहिती समोर आली आहे.

अनिल मेहता यांनी ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी घरात केवळ मलायकाची आई होती. तर मला एकाही पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पुण्यात आली होती. वडिलांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ती तात्काळ मुंबईला रवाना झाली. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार मलायकाच्या घरी पोहोचले. पोलिसांनी तपासही सुरू केला मात्र अनिल मेहता यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीत होता. मात्र याचच उत्तर आता मिळालं आहे.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांसह, फॉरेन्सिकची टीम ही पोहोचली होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मलायकाच्या आईने सांगितल्याप्रमाणे अनिल मेहता बाल्कनीत पेपर वाचत होते. त्यानंतर मोठा आवाज झाला. बाल्कनीत पाहिले असता त्यांची चप्पल फक्त तिथे होती आणि खाली डोकावल्यानंतर वॉचमन मदतीसाठी ओरडताना दिसला. दरम्यान मेहता हे अनेक दिवसांपासून आजारांशी झुंज देत होते. ते आजारपणांना कंटाळले असल्याचं त्यांनी त्यांच्या मुलींना सांगितलं होतं. आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री त्यांनी मुलगी मलायका हिच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. त्यानंतर मला एका आणि तिची लहान बहिण अमृता या दोघीही वडिलांना भेटण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळेस आपण आजारपणांना कंटाळलो असल्याचं मेहता यांनी सांगितलं होतं.

दोन्ही मुलींची भेट घेऊन त्यांच्याशी आजारपणाबद्दल चर्चा केल्यानंतर अनिल मेहता यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या मागे हेच कारण असू शब्द असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ही आत्महत्याच आहे की आणखी काही याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.