Made In Heaven 2 trailer

Made In Heaven 2 trailer : बहुप्रतिक्षित ‘मेड इन हेवन 2’ सीरिजचा ट्रेलर रिलीज

619 0

मुंबई : मेड इन हेवन या सीरिजला प्रेक्षकांनी (Made In Heaven 2 trailer) मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली होती. मेड इन हेवन ही सीरिज 2019 मध्ये (Made In Heaven 2 trailer) प्रदर्शित झाली. आता या सिरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याअगोदर या सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 3 मिनिटे 23 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये अनेक कलाकारांची झलक बघायला मिळते.

मेड इन हेवन-2 ही वेब सीरिज वेडिंग प्लॅनर्सवर आधारित आहे. मेड इन हेवन-2 या वेब सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आता या सिरीजची उत्सुकता लागून राहिली आहे.मृणाल ठाकूर, दिया मिर्झा, राधिका आपटे या अभिनेत्रींची झसक देखील मेड इन हेवन-2 सीरिजच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे.जोया अख्तर, अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान आणि नित्या मेहरा या चार दिग्दर्शकांनी या सारिजचे दिग्दर्शन केले आहे.

https://www.instagram.com/reel/CvZJFapAWqc/?utm_source=ig_embed&ig_rid=3b8f971d-5283-4816-a187-e22a893f71d7

कधी रिलीज होणार ‘मेड इन हेवन 2’ सीरिज?
‘मेड इन हेवन 2’ ही सीरिज 10 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर यांच्यासोबतच कल्की कोचलिन, जिम सरभ, शशांक अरोरा, मोना सिंह, इश्वाक सिंह, त्रिनेत्रा,शिबानी दांडेकर हे कलाकार या सिरीजमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!