Ajitabh Ani Amitabh

बिग बींच्या कुटुंबियांबद्दल ही रंजक माहिती तुम्हाला माहित आहे का?

579 0

मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अशी ज्यांची ओळख आहे असे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. मात्र आज आपण त्यांच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेऊया… त्यांच्या कुटुंबात पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय, नात आराध्या, लेक श्वेता नंदा व त्यांची मुलं सर्वांना परिचित आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या लहान भावा बद्दल सांगणार आहोत. त्यांचे नाव आहे अजिताभ बच्चन. ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत, तसेच ते भारताच्या बाहेर राहतात.

अमिताभ बच्चन यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्यांचे पालक डॉ. हरिवंशराय बच्चन (Dr. Harivansh Rai Bachchan) आणि तेजी बच्चन (Teji Bachchan) यांना 18 मे 1947 रोजी दुसरा मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव अजिताभ बच्चन ठेवले. अमिताभप्रमाणेच अजिताभ यांनीही नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. अजिताभ हे खूप हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना बिझनेसची खूप आवड होती. यामुळे त्यांनी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर आपल्या उद्योजकाच्या प्रवासाला सुरुवात केली. काही वर्षे भारतात काम केल्यानंतर अजिताभ लंडनला गेले आणि ते एक प्रतिष्ठित उद्योगपती बनले.

कोण आहेत अजिताभ बच्चन ?
अजिताभ हे क्यूए हायड्रोकार्बन्स प्रायव्हेट लिमिटेड, एएसएन हायड्रोकार्बन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एएसएन इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. अजिताभ (Ajitabh Bachchan) यांच्या पत्नीचे नाव रमोला (Ramola) आहे. यामध्ये सर्वात विशेष म्हणजे अमिताभ यांनी अजिताभ आणि रमोला यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमिताभ यांनीच त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली होती. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले, त्यांनी लग्न केलं आणि ते लंडनला गेले. अजिताभ आणि रमोला यांना भीम नावाचा एक मुलगा, व निलिमा, नम्रता आणि नयना नावाच्या तीन मुली आहेत.

Share This News
error: Content is protected !!