Ketki Chitale

Maratha Aarakshan : एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?; केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

1447 0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले उपोषण आठ दिवसांनंतरही सुरूच आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान मराठा आरक्षणाला राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. आता कलाकारांनीदेखील या आंदोलनावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शांततेत सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. मागच्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत, काही ठिकाणी बसेस फोडण्यात आल्या. यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी एक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने केली आहे. अभिनेत्री केतकी चितळे ही कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. अनेकवेळा ती आपल्या पोस्टमुळे वादातदेखील अडकली आहे. तिने आता केलेली पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तसेच या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे केतकीची पोस्ट?
“एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?? इंडियाला युनिफॉर्म सिव्हिल कोड हवा असेल, पण भारताला युनिफॉर्म सिव्हिल लॉ, तसेच युनिफॉर्म क्रिमिनल लॉची गरज आहे. सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला असता तर?” अशी पोस्ट केतकीने शेअर केली आहे.

Share This News
error: Content is protected !!