Kajol

Kajol : 31 वर्षाच्या करिअरमध्ये काजोलने पहिल्यांदाच मोडली ‘ती’ पॉलिसी; म्हणाली ‘लोक काय म्हणतील….

710 0

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. तिचे चाहतेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. काजोलने (Kajol) चित्रपटसृष्टीत तब्बल 31 वर्षे पूर्ण केली आहेत. आजवर तिनं अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मोठ्या पडद्यानंतर काजोलने ओटीटीवर पदार्पण केलं असून सध्या काजोल तिच्या वेब सिरीजमुळे चर्चेत आली आहे. या सिरीजमध्ये काजोलनं एका वकिलाची भूमिका साकारली असून तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. या वेबसीरिजमध्ये काजोलनं आपल्या 31 वर्षांच्या करिअरमध्ये जी पॉलिसी फॉलो केली होती. ती आज मोडली आहे.

काय आहे ती पॉलिसी?
द ट्रायल वेब सीरिजमध्ये काजोल आणि अली खान मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सिरीज चांगलीच गाजते आहे आणि याचं कारण म्हणजे काजोलनं केलेलं ऑनस्क्रीन किस. काजोलने या शोमध्ये तिच्या कारकिर्दीतील पाहिला वहिला ऑनस्क्रीन लीप लॉक किस केलं आहे. यापूर्वी अभिनेत्री ऑनस्क्रीन किस करणं टाळायची. पण आता काजोलने अभिनेता अली खानला किस केले आहे. या सगळ्यांवर काजोलने खुलासा केला आहे.

https://www.instagram.com/p/CuYtArpgkwc/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

या सीनविषयी बोलताना ती (Kajol) म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात ‘लोक काय म्हणतील’ याकडे कधीच लक्ष दिले नाही. मला एका खंबीर आईनं वाढवलं आहे. माझ्या आईला समाजाची अजिबात पर्वा नव्हती. माझ्या आईनं मला नेहमीच इतर कोणीही महत्त्वाचं नाही आणि तुझं जीवन ही तुझी जबाबदारी आहे आणि त्याबद्दल इतर कोणाचे मत महत्त्वाचे नाही असं नेहमीच शिकवलं आहे” असा खुलासा केला आहे.

Share This News
error: Content is protected !!