मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) 17 जुलैपासून सुरुवात होत असून या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर हे पहिलंच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) होत असून हे विविध कारणांनी लक्षवेधी ठरण्याची शक्यता असून या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे वादळी ठरू शकतात हे पाहुयात…
विरोधी पक्षनेते कोण होणार: राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पदावर दावा केला असून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार यांची नावं विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेत आहेत. या पावसाळी अधिवेशनातच विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल.
Jalna Murder : धक्कादायक! चर्चेला बोलावलं अन् घात केला; जालन्यात वंचितच्या जिल्हा महासचिवांची हत्या
राष्ट्रवादीत व्हीप कोणाचा: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली तर शरद पवार गटाकडून माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीत नेमका कुणाचा व्हीप लागू होणार याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा: राज्यात मागील अनेक दिवसांपासून लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायद्याची चर्चा असून हा कायदा लागू व्हावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठिकठिकाणी मोर्चे देखील काढण्यात आले होते त्यामुळे या अधिवेशनात लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा संमत होण्याची शक्यता आहे.
Pune News : धक्कादायक! रात्री लावलेल्या दिव्यामुळे वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू
दुबार पेरणीचं सावट: जुलै महिना उजाडला तरी राज्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभा राहिलंय याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
एकंदरीतच काय तर राज्याच्या या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) सर्वसामान्यांच्या हिताचे कोणते निर्णय होणार हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.