नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष, पाहा व्हिडिओ

193 0

मुंबई- बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘झुंड’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केले आहे.

‘सैराट’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या नागराज मंजुळे यांनी त्यांच्या ‘झुंड’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. टीझरमध्ये अमिताभ बच्चन हे प्रशिक्षकाच्या लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा ‘अँग्री यंग मॅन’ अंदाज या चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असा अंदाज अनेकांनी टीझर पाहून लावला आहे. टीझरमध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लाहान मुलांची टीम देखील दिसत आहेत.

एका मुलांच्या घोळक्याने टीझरची सुरुवात होते आणि त्याच घोळक्याने शेवट. पण, यादरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांची झलकही सर्वांनाच थक्क करुन जात आहे. भांडी, बस बडवणाऱ्या या मुलांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशीच हातमिळवणी केली आहे. 4 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे यांचा बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट असून महानायक अमिताभ बच्चन यांची त्यामध्ये प्रमुख भूमिका आहे.

Share This News
error: Content is protected !!