Jaya Prada

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदा यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास; सोबत 5 हजारांचा दंड

4550 0

मुंबई : चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच (Jaya Prada) रायपेटा, चेन्नई येथे त्यांच्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात त्यांना 5 हजार रुपयांचा दंडदेखील ठोठवण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
हा चित्रपटगृह चेन्नईचे राम कुमार आणि राजा बाबू चालवतात. थिएटर कामगारांना ईएसआय देण्यास व्यवस्थापन अपयशी ठरल्याने कामगारांनी न्यायालयात धाव घेतली. नंतर, अभिनेत्रीने कर्मचार्‍यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले आणि खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी त्यांच्या अपीलवर आक्षेप घेतला, त्यानंतर जया प्रदा आणि या प्रकरणाशी संबंधित इतर तिघांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली तसेच प्रत्येकाला 5 हजार रुपये दंडदेखील ठोठावण्यात आला.

जया प्रदा यांची राजकीय कारकीर्द
रामपूरमधून खासदार राहिलेल्या जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द 1994 मध्ये तेलगू देसम पक्षातून सुरू झाली होती. जयाप्रदा 1196 मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात सहभागी झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Share This News
error: Content is protected !!