बॉलीवूड अभिनेते सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सनीचे चाहते काही दिवसांपासून या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. ‘गदर 2’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असला तरी रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याने याच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे सिनेमाच्या कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केलेली 20 लाखांपेक्षा अधिक कमाई
या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 20 लाखांपेक्षा अधिक कमाई केली होती. पण आता ‘गदर 2’ हा सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. सनी देओलचा ‘गदर 2’ हा सिनेमा तमिलरॉकर्स, मूवीरूल्ज, फिल्मजिला, टेलीग्राम यांसारख्या साइटवर ऑनलाइन लीक झाला आहे.
बॉलिवूड अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री आमिषा पटेल यांचा बहुचर्चित चित्रपट ‘गदर 2’ (Gadar 2) गदर: एक प्रेम कथा या 2001 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा ‘गदर 2′ (Gadar 2) हा सिक्वेल आहे. गदर: एक प्रेम कथा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.’गदर 2’ या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.’गदर 2’चं कथानक तारा सिंह आणि त्याचा मुलगा चरणजीत सिंह यांच्याभोवती फिरणारं आहे.