बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोन ही अनेकदा चर्चेत असते. आताही तिने केलेल्या एका विधानामुळे ती चर्चेत आली आहे. आपण आपल्या चार मुलींना गमावल्याचे दुःख तिने व्यक्त केलं आहे.
सनीला आत्ता दोन जुळी मुलं असून भारतातील एक मुलगी तिने दत्तक घेतलेली आहे. तर जुळी मुलं तिला सरोगसीच्या माध्यमातून झालेली आहे. याच बद्दल तिने एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. तिने आपला दुर्दैवी अनुभव प्रेक्षकांना सांगितला.
या मुलाखतीत सनी म्हणाली, ‘मी आणि माझा पती डॅनियलनं सरोगसी करण्याचं ठरवलं होतं. यासाठी आम्ही अमेरिकेत 6 एग्स फ्रीज केले होते. अमेरिकेत बाळाच्या लिंग विषयी माहिती आधीच दिली जात असल्यामुळे आम्ही तिथे एग्स फ्रिज केले. 4 मुलींसाठी आणि 2 मुलांसाठी एग्स फ्रिज केले होते. आधी मुलींना जन्म द्यायचा विचार आम्ही केला. मात्र सरोगसी अयशस्वी झाल्यामुळे आम्ही त्या चारही मुलींना गमावलं. त्या मुली जगात येऊ शकल्या नाहीत. आमच्या दोघांसाठी ती खूप दु:खद गोष्ट होती. कारण आम्हाला मुली हव्या होत्या.’
या प्रसंगानंतर सनी आणि तिचा पती डॅनियल हे दोघेही खूप खचले होते. त्यानंतर घडलेली घटना देखील तिने या मुलाखतीत सांगितली. ती म्हणाली, ‘आम्ही मुंबईत एका ठिकाणी गेलो होतो. तिथे अनेक छोट्या छोट्या मुली होत्या. त्यांना पाहून मी त्याने यांना म्हणाले आपण मुलगी दत्तक का घेत नाही ? जेनेटिकली ती आपली मुलगी आहे की नाही याने काय फरक पडणार आहे ? आपण मनाने तिच्याशी कनेक्टेड राहू शकतो ना.’
याच प्रसंगानंतर सनी आणि डॅनियल यांनी भारतीय मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला व सध्या या दोघांनीही दत्तक घेतलेली ही मुलगी त्यांच्याबरोबरच राहत असून सनी आणि डॅनियल हे सरोगसीच्या माध्यमातून झालेल्या जुळ्या मुलांचे आणि एका दत्तक मुलीचे पालक आहेत.