परस्पर संमतीने दीर्घ कालावधीसाठी शारीरिक संबंध ठेवणे हे बलात्काराच्या श्रेणीत येत नाही, असा मोठा निर्णय इलाहाबाद हायकोर्टने एका प्रेम प्रकरणासंदर्भात निर्णय दिला आहे. अशा प्रकारच्या संबंधात फसवणुकीचा कोणताच प्रकार नसतो, असं निरीक्षण नोंदवत महिलेने केलेला बलात्काराचा आरोप कोर्टाने फेटाळला आहे.
एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वर्षांपासून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तिच्या आरोपावरून आरोपी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर हा मोठा निर्णय कोर्टाने दिला.
पतीच्या मृत्यूनंतर सुरू झालं होतं प्रेम प्रकरण
संबंधित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. पतीच्या मृत्यूनंतर श्रेय गुप्ता नावाच्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने तिला अनेकदा लग्नाचे वचन दिले होते, परंतु नंतर त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तो दुसऱ्या महिलेच्या संपर्कात आला. असा आरोप तक्रारदार महिलेने केला.
महिलेच्या तक्रारीवरून कनिष्ठ न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली. त्यानंतर हा फौजदारी खटला रद्द करण्यासाठीची याचिका आरोपींनी उच्च न्यायालयात केली. यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
तक्रारदार महिला आणि याचिका करता पुरुष यांच्यात गेल्या 12 ते 13 वर्षांपासून शारीरिक संबंध होते. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचा पती हयात असल्यापासून या दोघांचे संबंध होते. महिलेचे नैतिक संबंध असलेला हा पुरुष महिलेचा पती काम करत असलेल्या कंपनीत काम करत होता. या दोघांची भेट झाल्यानंतर महिलेने त्याला प्रभावित केले. या महिलेपेक्षा हातरून वयाने खूप लहान आहे. मात्र तरीही अनेक वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेम संबंध होते. मात्र आपण निर्दोष असल्याचं आरोपीने कोर्टात सांगितलं.
या प्रकरणावर निर्णय देताना नईम अहमदविरुद्ध हरियाणा राज्य या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत इलाहाबाद हायकोर्टाने लग्नाच्या प्रत्येक तुटलेल्या वचनाला खोटे वचन मानून एखाद्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवणे आणि खटला चालवणे मूर्खपणाचे ठरेल, असा मोठा निर्णय दिला.