Waheeda Rehman

Waheeda Rehman : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

953 0

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. वहिदा रहमान यांनी सिनेसृष्टीत 5 दशकांचे योगदान दिले आहे. याआधी वहिदा रेहमान यांचा पद्मभूषण, राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. 85 वर्षांच्या वहिदा रेहमान यांनी हिंदी चित्रपटसष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

85 वर्षांच्या वहिदा रेहमान यांनी अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून रंगीत दुनियेपर्यंत वहिदा रेहमान यांनी आपल्या अभियनाची छाप उमटवली आहे. आपल्या मोठ्या कारकिर्दीत वहिदा रेहमान या त्यावेळच्या दिग्गज अभिनेंत्रींपैकी एक होत्या. त्यावेळचे अभिनेते देव आनंद, राज कपूर, राजकुमार, मनोज कुमार आणि सुनील दत्त अशा नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर वहिदा रेहमान यांनी काम केलं आहे. वहिदा रेहमान यांनी साकारलेल्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.

वहिदा रेहमान यांच्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 रोजी चेन्नईमध्ये झाला. 1955 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सीआयडी हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीची सुरुवात वहिदा रेहमान यांनी नकारात्मक भूमिकेपासून केली. पण त्यांच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांची जोडी स्क्रिनवर लोकांना आवडू लागली. या जोडीने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’ आणि ‘साहब बीवी और गुलाम’ हे वहिदा रेहमान यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

Share This News
error: Content is protected !!