Kolhapur Crime

Kolhapur Crime : पुरोगामी महाराष्ट्र हादरला ! वंशाच्या दिव्यापायी केला विवाहितेचा छळ; अन्…

560 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मुली असल्याने आणि वंशाचा दिवा पाहिजे म्हणून सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अस्मिता केदारी चौगले (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असं विवाहितेचे नाव असून पती सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा पाहिजे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने सदर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. विवाहितेचे वडील दगडू सदाशिव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि केदारी यांचा 13 वर्षांपूर्वी केदारी यांच्याशी विवाह झाला होता. केदारी आणि अस्मिता यांना एक 9 आणि दुसरी 8 वर्षांची अशी दोन मुली आहेत. त्यामुळे मुलगा होत नसल्याने पती, सासू आणि सासऱ्याकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता.

या त्रासाला कंटाळून अस्मिताने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना लक्षात येताच पतीने त्यांना तातडीने सीपीआर रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. यानंतर केदारी चौगलेचा पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले (तिघे रा. कोथळी, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Accident News

Accident News : समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; 20 जण जखमी

Posted by - July 12, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : जेव्हापासून समृद्धी महामार्ग लोकांसाठी खुला करण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत अपघाताचे (Accident News) सत्र सुरूच आहे. ते काही…
Pune News

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Posted by - May 20, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने…
Crime

पुण्यात अल्पवयीन मुलांकडून तरुणाची दांडक्याने मारहाण करून हत्या; हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - July 21, 2024 0
पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पोलीस प्रशासनाकडून अनेक उपाययोजना, कठोर नियम करूनही पुण्यात गुन्हे वाढत आहेत. विशेष म्हणजे…
Weather Update

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Posted by - April 28, 2024 0
मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये (Weather Update) गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे काही ठिकाणी…
Viral Video

गैरवर्तन करणाऱ्या वृद्धाला तरुणीने भर रस्त्यात दिला चोप ( Video)

Posted by - May 19, 2023 0
मुंबई : आपल्या देशाने कितीही प्रगती केली तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. पोलीस प्रशासन 24 तास तैनात असताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *