धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीपासूनच चर्चेत मध्ये राहिला. सगळ्यांनाच माहिती आहे हा चित्रपट आनंद दिघे यांच्यावर बनला आहे. धर्मवीर २ मध्ये त्यांची हिंदुत्वाची गोष्ट दाखवली आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांचे ठाण्यात आणि राज्यातले काही गाजलेले प्रसंग दाखवले आहेत. पण या चित्रपटात 4 असे प्रसंग दाखवले आहेत ज्याने महाराष्ट्रचं राजकारण तापलं आहे.
ते चार प्रसंग कोणते आहेत चला ते पाहूयात:
पहिला प्रसंग आहे आयोध्यातल्या कारसेवेचा. चित्रपटात हा पूर्ण प्रसंग दाखवला नाहीये पण कारसेवा झालीये आणि त्याचा सगळेजण नाचात गाजत आनंद साजरा करत आहे हे दिसतय. 1987 मध्ये आनंद दिघे यांनी अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर उभारणीसाठी चांदीची वीट पाठवली होती. हा प्रसंग त्यावेळच्या राम जन्मभूमी आंदोलनाशी संबंधित आहे, ज्यात राममंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते एकत्र आले होते. 1987 मध्ये त्यांनी ‘चांदीची वीट’ अयोध्येला पाठवली, ती पूर्ण भारतातून पाठवलेली पहिली चांदीची वीट होती. जी त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा आणि राममंदिराच्या चळवळीतील योगदानाचा एक महत्त्वपूर्ण भाग मानली जाते. ही चांदीची वीट लोकसहभागातून पाठवली गेली होती. ठाण्यातील प्रत्येक घरातून एक एक चांदीची वस्तू दिली गेली आणि तब्बल काही दिवसांतच सव्वा किलो चांदी जमा झाली. त्या चांदीला वितळवून त्याला विटेचा आकार दिला आणि त्यावर जय श्री राम लिहिलं.
त्यानंतर दुसरा प्रसंग दाखवला आहे तो म्हणजे मलंगडाबद्दलचा,: हाजी अब्दुल रेहमान यांची कबर मलंगगडावर आहे असा मुसलमानांच म्हणणं होता आणि गोरख नाथ पंत यांना मानणाऱ्या हिंदू समाजात चित्र नाथ पंत यांची समाधी तिथे आहे असा म्हणणं हिंदू समाजच होता आणि या वरूनच 80च्या दशकात वाद होता. मुस्लिम समाज ‘हाजी मलंग’म्हणून मलंगगडाला ओळखायचा आणि त्या वेळेस ८०च्या दशकात पहिल्यांदाच शिववसेना यांनी हा मुद्दा धरून ठेवला. आणि हाजी मलंग म्हणून नाही तर ‘चित्र नाथ पंत’ यांची समाधी असेलला हा गड ‘श्रीमलंग’ म्हुणन ओळखला जायला पाहिजे असा ठरवला. आनंद दिघे यांनी आंदोलन करुन सर्व हिंदू समजला एकत्रित आणला आणि ही त्याची मागणी त्यांनी धरून ठेवली आणि तेव्हा पासून त्यांना धर्मवीर हे नाव मिळाल.पुढे बाळा साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गडावर हिंदू प्रथा सुरु करन्यात आली. यात आनंद दिघे यांचा मोठा वाटा ठरला.
पुढे तिसरा प्रसंग आहे गणेशोत्सवात सावरकरांवर देखावा केल्यामुळे त्यागी नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्यासोबतच शिवसैनिकाचा संघर्ष झाला त्याबद्दलचा. त्या काळात हा किस्सा बराच गाजला होता. तो किस्सा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त त्यागी, सावरकरांवर केलेला देखावा काढायला लावतात आणि त्यानंतर संघर्ष होतो ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत.
चौथा प्रसंग आहे तो म्हणजे भिवंडी मधून साखरेचे पोत आणण्याचा. : ठाण्यात दिवाळी सारख्या सणामध्ये साखर टंचाई होते. लोकांना घरात गोड धोड करायला पण सारखं नसते. काही गोदामांनी साखर पुरवठा केला होता आणि अश्याच एका गोदामामध्ये शिवसैनिक शिरतात आणि पोती घेऊन येतात, असा हा सीन आहे. असा म्हणतात की त्यावेळेस ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांना दिली होती. आणि त्यावेळेस त्यांनी ही जबाबदारी पार पाडली आणि आनंद दिघे यांचं मनं जिंकल. चित्रपटात हा सीन थोडा वेगळा दाखवला आहे. पण असा म्हणतात याच नंतर आनंद दिघेचे एकनाथ शिंदे हे खास बनले. पुढे धर्मवीर २ मध्ये दोघांच्या नात्याचे अनेक प्रसंग दाखवण्यात आले आहे.