Nitin Desai : ‘मिट्टी से जुडे थे, मिट्टी के लिये लडे थे.. दिग्दर्शक नितीन देसाईंची ‘ती’ शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल
मुंबई : sophie rain leaked onlyfans आज सकाळच्या सुमारास सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये त्यांनी सकाळी ४ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. नितिन देसाई (Nitin Desai) हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत स्थानिक आमदाराने केला ‘हा’ मोठा खुलासा
नितीन देसाईंची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल
मिट्टी से जुडे हैं.. मिट्टी के लिये लडे थे.. देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी असं म्हणत हॉटस्टारवर येणाऱ्या आणि महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टिझर नितीन देसाई यांनी २६ जानेवारी रोजी पोस्ट केला होता. ही त्यांची शेवटची पोस्ट ठरली आहे. यानंतर त्यांनी फेसबुकवर कोणतीच पोस्ट केली नव्हती.
नितीन देसाई यांनी 1989 मध्ये ‘परिंदा’ सिनेमातून त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांमध्ये नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शनाची भूमिका बजावली. एवढंच नाहीतर, ‘देवदास’, ‘खामोशी’ सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नितीन देसाई यांनी संजय लिला भंसाळी, विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारिकर यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत नितीन देसाई यांनी काम केलं आहे.
