Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत स्थानिक आमदाराने केला ‘हा’ मोठा खुलासा

756 0

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आज सकाळी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. नितिन देसाई (Nitin Desai) हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

स्थानिक आमदाराकडून मोठा खुलासा
कर्जतचे आमदार महेश बालदी यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना म्हंटले कि, गेल्या अनेक दिवसांपासून स्टुडिओमध्ये काम चालत नव्हते. ते आर्थिक विवंचनेत होते. याच कारणातून त्यांनी पाऊल उचलले असावे असे ते म्हणाले आहेत. पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Nitin Desai : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेऊन आत्महत्या

नितीन देसाई यांनी 1989 मध्ये ‘परिंदा’ सिनेमातून त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या सिनेमांमध्ये नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शनाची भूमिका बजावली. एवढंच नाहीतर, ‘देवदास’, ‘खामोशी’ सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नितीन देसाई यांनी संजय लिला भंसाळी, विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारिकर यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत नितीन देसाई यांनी काम केलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!