Rio Kapadia

Rio Kapadia Pass Away : ‘दिल चाहता हैं’ फेम अभिनेते रिओ कपाडिया यांचे निधन

798 0

मनोरंजनविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल चाहता हैं फेम ज्येष्ठ अभिनेते रिओ कपाडिया यांचे (Rio Kapadia Pass Away) वयाच्या 66 व्या वर्षा निधन झाले आहे. मागच्या अनेक वर्षांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. नुकतीच त्यांची मेड इन हेवन ही वेबसिरिज प्रदर्शित झाली होती. त्यांच्या अभिनयाचे अनेक जणं फॅन्स होते. जाहिरात, मालिका, चित्रपट, वेबसिरिज अशा अनेक माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यामुळे अचानक त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रिओ कपाडिया यांची कारकीर्द
रिओ कपाडिया यांची ‘मेड इन हेवन 2’ ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. त्यात त्यांनी अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या वडिलांचे काम केले होते. ‘सपने सुहाने लडकपन के’, ‘कुटूंब’, ‘जुडवा राजा’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ अशा लोकप्रिय मालिकांतूनही कामं केली होती. सोबतच केएसीच्या जाहिरातीतही ते दिसले होते. त्यांनी चक दे इंडिया, दिल चाहता हैं, हॅप्पी न्यू इयर अशा अनेक चित्रपटांतून कामं केली आहेत. त्याचसोबत त्यांनी आपली स्वत:ची ओळखही निर्माण केली होती. त्यांनी लोकप्रिय मालिकांतूनही नावं कमावली होती. त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमेदेखील केले होते. अगदी छोट्या छोट्या भुमिकेही त्यांनी अजरामर केल्या होत्या.

रिओ कपाडिया यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिव धाम स्मशान भूमी, गोरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मारिया फराह आणि मुलं अमन आणि वीर आहेत.त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीत प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेत्यांनीही यावेळी त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.

Share This News
error: Content is protected !!