Satara News

Satara News : पुणे -बंगळूरु महामार्गावर आयशर ट्रकचा भीषण अपघात; 3 जण ठार

637 0

सातारा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. पुणे – बंगळूरु आशियाई महामार्गावर (Satara News) खंडाळा तालुक्यात शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला. फुटलेला टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या आयशर ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
पुणे -बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत बुधवारी रात्री आयशर (केए 22 एए 1541) ट्रकने दुसऱ्या (केए 53 सी 8343) ट्रकला जोरदार धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. रात्री पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने चालक टायर बदलत असल्याने ट्रक उभा होता. यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकासह अन्य दोघेजण होते. अपघातात आयशर ट्रकची केबीन चेपल्याने तिघेही अडकले होते. या जखमींना बाहेर काढून शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नसून शिरवळ पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!