मनोरंजन

City Of Dreams 3 : बहुप्रतिक्षित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आऊट

मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याअगोदर या सीरिजचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. यगोदरचे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस आले होते. त्यामुळे आता तिसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

हा टीझर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यातील राज्याच्या राजकारणाचा नुसता खेळ बनवलाय, प्रत्येक जण पार्टी बदलतोय, तुमचा साहेब अजून रिटायर झालेला नाही, सत्तेसाठी अंतिम लढा, मी पार्टी सोडत नाही तोडतो, असे दमदार डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. वडील आणि मुलीमधील सत्तेसाठीचा संघर्ष या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार ही सिरीज
‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ 26 मेपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनचा जिथे शेवट होतो तिथूनच तिसऱ्या सीझनची सुरुवात होणार आहे.या सिरीजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), प्रिया बापट (Priya Bapat) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) मुख्य भूमिकेत आहेत. नागेश कुकुनूर यांनी सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.