parbhani

Parbhani News : सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; नेमके काय घडले?

821 0

परभणी : परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये सेप्टिक टॅंकची (septic tank) सफाई करताना पाच कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. हि दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारामध्ये घडली आहे. हे कामगार रात्रीच्या सुमारास सेप्टिक टॅंक स्वछ करण्यासाठी उतरले होते तेव्हा ही घटना घडली आहे.

या घटनेमुळे भाऊचा तांडा शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. शेख सादेक (वय 55), शेख जुनेद (वय 32) शेख शारोक (वय 28), शेख नवीद (वय 28), शेख फेरोज (वय 29) अशी या दुर्दैवी घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मृत व्यक्तींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

काय घडले नेमके?
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या शिवारातील एका शेतातील घराच्या सेफ्टीक टॅंक स्वछ करण्याचे कंत्राट परभणी आणि सोनपेठ मधील काही कामगारांनी घेतले होते. यामुळे काल रात्री शेख सादेक, शेख जुनेद, शेख शाहरूख, शेख नवीद, शेख फेरोज, शेख साबेर हे सहा जण सेफ्टीक टॅंक स्वछ करत होते. तसेच आणखी एक त्यांचा सहकारी टॅंकवरती होता.हे स्वछतेचे काम सुरु असताना ही घटना घडली.

धक्कादायक! नातेवाईकाच्या दहाव्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

हे कामगार नेमके गुदमरले कि त्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या अपघातात शेख सादेक, शेख जुनेद,शेख शाहरूख,शेख नवीद,शेख फेरोज यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख साबेर यांना अत्यवस्थ अवस्थेमध्ये परळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

नात्याला काळिमा फासणारी घटना : घरी खेळायला आलेल्या 2 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षीय आजोबाचा अत्याचार; अहमदनगर मधील धक्कादायक घटना

Posted by - February 20, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरी खेळायला आलेल्या एका दोन वर्षाच्या चिमूरडीवर…
accident

राज ठाकरेंच्या सभेसाठी रत्नागिरीला निघालेल्या मनसे नेत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 6, 2023 0
रत्नागिरी : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरी या ठिकाणी एक जाहीर सभा आहे. या सभेसाठी मनसे नेते वेगवेगळ्या…

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची आकर्षक पुष्पसजावट

Posted by - June 3, 2022 0
फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या…
Accident News

Accident News : नाना पटोलेंनंतर आता ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Posted by - April 10, 2024 0
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात (Accident News) झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका आमदाराच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *